धन वापसीची वेळ आली आहे!

भारत श्रीमंत आहे, भारतीय मात्र गरीब आहेत. हे समीकरण बदलण्याची वेळ आली आहे.

भारताच्या सार्वजनिक संपत्तीत प्रत्येक भारतीय कुटुंबाचा ५० लाख रुपयांचा वाटा आहे. हीच वेळ आहे धन वापसीची- प्रतिवर्ष प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपये सुपूर्द करण्याची, ज्याद्वारे गरिबी, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांसारख्या सदैव सामना कराव्या लागणाऱ्या आपल्या समस्या कायमच्या संपुष्टात येऊ शकतात.

ही एक धाडसी कल्पना आहे. सार्वजनिक संपत्ती म्हणजे काय, आपल्याला ती परत का मिळायला हवी, आपण सर्व मिळून हे कसे घडवू शकतो, हे मी तुम्हाला समजावून सांगतो.

***

मी राजेश जैन मी राजकारणी नाही. मी समस्यांचे निराकरण करणारा आहे, मी उद्योजक आहे. गेल्या २५ वर्षांत मी तंत्रज्ञानाच्या जगातील लाखो समस्या सोडवल्या आहेत.

१९९०च्या उत्तरार्धात, मी जगभरातील भारतीयांसाठी माहितीची दरी मिटवण्याकरता पहिले इंटरनेट पोर्टल स्थापन केले. तुमच्यापैकी जे वयाने मोठे आहेत, त्यांना Samachar.com, Khoj.com, Khel.com आणि Bawarchi.com आठवत असेल. सध्या, माझी कंपनी ब्रँड्सना त्यांच्या ग्राहकांशी सखोल संबंध प्रस्थापित करण्यासाठी मदत करते.

२००८ मध्ये माझ्या आयुष्याची दिशा बदलली- मला एक ‘नई दिशा’ मिळाली. माझ्या एका मित्राने विचारलेल्या प्रश्नामुळे हे घडलं. त्याने विचारलं, “राजेश, जेव्हा तुझा तीन वर्षांचा मुलगा मोठा होईल आणि तुला विचारेल- ‘बाबा, भारतात जे काही चुकीचे होत होते, ते तुम्ही पाहत होतात. तुमच्याकडे वेळ होता आणि पैसाही होता. तरीही तुम्ही काहीच का केलं नाही?’यांवर तुझं काय उत्तर असेल?” या प्रश्नाने माझा नवा प्रवास सुरू झाला.

भारताचा कायापालट करण्यासाठी राजकारणाचा वापर कसा करता येईल हे पाहणे हा माझा त्यावरील उपाय होता. २००९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच मी काही मित्रांसह‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’स्थापन केली.

२०११ मध्ये मी लिहिली सार्वजनिक ब्लॉग पोस्ट ज्यात आगामी निवडणुकीत भाजपा कसे जिंकू शकेल, याची एक रुपरेषा मांडली होती. २०१२ मध्ये, मी माझ्या स्वत:च्या पैशाने निवडणुकीतील नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी माध्यमे, डेटा, विश्लेषण आणि स्वयंसेवी काम यासाठीची १०० जणांची टीम निर्माण केली. २०१४ च्या निवडणुकीत, भाजपाला स्वबळावर बहुमत प्राप्त झाले आणि मोदी भारताचे पंतप्रधान बनले.

मात्र, जरी नेते बदलले तरी, जोवर कायदे बदलत नाहीत, तोपर्यंत परिणाम बदलणार नाही, हे मला नंतरच्या काळात समजून चुकले. ७१ वर्षांत, २० सरकारे आणि भारतीयांच्या तीन पिढ्या आल्या, तरीही राजकारणी आपल्यासमोर गरिबी, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांसाठीच्या उपाययोजना करत आहेत आणि परिस्थितीत जरासाही फरक पडला नाही. या नेहमीच्या समस्या आपल्याला आजही भेडसावत आहेत. भारताला आज गरज आहे, ती ‘नई दिशा’ची, एका वेगळ्या दिशेची. या विचारांतूनच ‘धन वापसी’च्या कल्पनेचा जन्म झाला. धन-वापसी

***

आपल्या प्रश्नांपाशी पुन्हा परतुया. आपले धन कुठे आहे? भारताची सार्वजनिक संपत्ती कोणती? सार्वजनिक संपत्ती, खनिजांचे साठे आणि सार्वजनिक क्षेत्रांतील उपक्रम आणि त्यांची संपत्ती ही देशाची सार्वजनिक संपत्ती आहे. या संपत्तीत आपण सारे भागधारक आहोत. ही संपत्ती कुठल्या परदेशी बँकेत नाही, तर ती आपल्या देशात- आपल्या भोवताली आहे. हा काळा पैसा नाही. हा आपला पैसा आहे. आणि ही संपत्ती किती आहे? १५०० लाख कोटी रुपये. म्हणजे १५ आकड्यानंतर येणारी १४ शून्ये. याद्वारे देशातील प्रत्येक कुटुंबाला ५० लाख रुपये मिळू शकतात.

भारत देश श्रीमंत आहे, मात्र भारतीय गरीब आहेत. सरासरी भारतीय कुटुंब वर्षाकाठी केवळ एक लाख रुपये मिळवतात- म्हणजेच पाच जणांचे कुटुंब महिन्याला दहा हजार रुपयांहून कमी मिळवतात. त्यांची खूप कमी बचत होते. आपल्याला हेच बदलायचे आहे आणि म्हणूनच आपल्याला आपली संपत्ती परत हवीय.

या संपत्तीवर राजकारणी आणि नोकरशहा यांचे नियंत्रण आहे. स्वातंत्र्याआधी ब्रिटिश राज्यकर्त्यांसारखीच या राजकारण्यांनीही आपली संपत्ती हिरावून घेतली आहे. ते किती आरामदायी जीवन जगतात, ते पाहा. ते महालासारख्या घरांमध्ये राहतात, आरामात प्रवास करतात आणि त्यांच्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था असते आणि या सगळ्यासाठीचे पैसे हे आपण भरलेल्या करातून अदा केले जातात.

चौकीदार हे जमीनदार बनले आहेत.

याता ही लूट थांबवण्याची वेळ आली आहे. आमची संपत्ती आम्हाला परत करा, अशी मागणी करण्याची वेळ आली आहे.

संपत्ती परत मिळवणे याचा अर्थ म्हणजे ती आपल्या कुटुंबावर कशी खर्च करावी, याचा निर्णय आपण घेऊ शकणे.

जेव्हा आपण अन्नावर खर्च करतो, तेव्हा शेतकऱ्यांना उत्पन्न मिळते. जेव्हा आपण इतर उत्पादनांवर आणि सेवांवर खर्च करतो, तेव्हा विक्रेत्यांना उत्पन्न मिळते. जेव्हा आपण इतर वस्तू आणि सेवांवर खर्च करतो, तेव्हा रोजगार वाढतो, नव्या नोकऱ्यांची निर्मिती होते. जेव्हा तारतम्य दूर ठेवून जेव्हा विविध योजनांबाबत निर्णय घेणाऱ्या राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना मिळणारे लाभ जेव्हा संपुष्टात येतात, तेव्हा आपण भ्रष्टाचार संपवू शकतो.

धनवापसी हा एक व्यावहारिक उपाय आहे, ज्याद्वारे गरिबी, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या तिहेरी वाईट गोष्टी दूर होऊ शकतात. आपली राज्यघटना निर्माण करणाऱ्यांनी सर्व भारतीयांसाठी जे स्वप्न पाहिले, त्या नागरिकांना स्वातंत्र्य, समानता आणि समृद्धी देणारे स्वप्न पूर्ण करणारी धन वापसी ही वैश्विक समृद्धी क्रांती आहे. धन वापसी हे एक स्वत:च्या अटींवर जीवन जगण्याचे खरे स्वातंत्र्य आहे. ज्यात सरकारची आपल्यावर मालकी नसेल, तर आपण सारे भारतीय प्रगतीत भागीदार असू. धन वापसी हे नि:पक्षपणा आणि न्यायाबाबत आहे. धन वापसी हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा हक्क आहे.

***

तर, मग आपण आपली संपत्ती कशी परत मिळवू शकतो? धन वापसी ही प्रत्यक्षात कशी घडू शकते? राजकारणी आणि नोकरशहा आपल्याला आपली संपत्ती परत देणार नाहीत. त्यांनी या संपत्तीबद्दल अवाक्षरही काढले नाही, इतकेच नाही तर ते आजही आपल्यापासून ही संपत्ती दडवू पाहत आहेत. आपल्या संपत्तीवरील राजकारणी आणि नोकरशहांचे नियंत्रण हटवण्यासाठी- ‘धन वापसी’साठी आणखी एका स्वातंत्र्य चळवळीची गरज आहे-

याकरता पहिली पायरी म्हणजे संख्यांची ताकद दाखवणे. आपण अधिक असू आणि एकत्र असू, तेव्हाच धन वापसी होऊ शकते. आपण आपला आवाज आणि आपले मत उपयोगात आणण्यासाठी तयार असलो तरच राजकारण्यांना आणि नोकरशहांना त्यानुसार कृती करणे भाग पडेल.

आपले संख्याबळ दाखविण्यासाठी, आम्ही DhanVapasi.com वर एक याचिका दिली आहे, ज्यात प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्ष एक लाख रुपये परत करावेत, अशी मागणी संसदेला केली आहे. तुम्ही या याचिकेवर स्वाक्षरी करावी, अशी माझी आपल्याला विनंती आहे.

हा एक आरंभबिंदू आहे. माझे सहकारी धन वापसी विधेयक बनवत असून हे विधेयक प्रत्येक खासदाराकडे पाठवले जाणार आहे, म्हणजे त्यांना हे विधेयक वाचता येईल, यासंबंधी ते चर्चा करू शकतील, त्यावर वाद-संवाद होऊ शकेल आणि ते संमत होऊ शकेल, मात्र जोपर्यंत आपला एकत्रित आणि घणाघाती आवाज त्यांना ऐकू जाणार नाही, ते त्यावर काहीही कार्यवाही करणार नाहीत.

***

समृद्धी हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि आपल्याकडे तो असेल, आपल्याकडे तो असायला हवा.

आणखी काही वर्षांनी जेव्हा आपले निकटवर्तीय आपल्याला विचारतील, “तुम्ही भारतासाठी काय केलेत?” तेव्हा तुम्हाला त्यांच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देता येईल, “मी धन वापसी घडवली. मी घडवली. आणि प्रत्येक भारतीय श्रीमंत झाला.”

मित्रांनो, कृती करण्याची वेळ आली आहे. आता आपली वेळ आली आहे.

वरील याचिकेला आपली सहमती दर्शवा DhanVapasi.com आणि तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रमंडळींनाही सांगा.

उद्याचे भविष्य उज्ज्वल होण्याकरता आज कृती करा.

जय हिंद.

तुमचा पाठिंबा व्यक्त करा