धन वापसी याचिकेला सहमती दर्शवून प्रत्येक भारतीयाला श्रीमंत आणि स्वतंत्र बनवूयात.

Responsive image

प्रिय पंतप्रधान आणि खासदार ,

भारत हा श्रीमंत देश आहे, मात्र भारतीय गरीब आहेत. भारतीयांची सार्वजनिक संपत्ती जमीन, सरकारी मालकीचे उपक्रम आणि खनिजे यांत कुलूपबंद अवस्थेत आहे. ही संपत्ती देशाच्या नागरिकांची आहे, मात्र सध्या सरकारकडे निष्कियरीत्या पडून आहे.

गेल्या ७० वर्षांत, एकापाठोपाठ एक आलेली सरकारे आपल्यासाठी समृद्धी आरण्यात अयशस्वी झाली आहेत आणि आपले स्रोत स्वत:च्या लाभासाठी वापरत आहेत. आपल्या सार्वजनिक संपत्तीचे सातत्याने शोषण होत आहे व तिचा गैरवापर होत आहे. आपल्याला जर एका समृद्ध राष्ट्रात राहायचे असेल आणि आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित असावे, असे वाटत असेल तर कायम राहणारे गरिबीचे चक्र, बेरोजगारी, शिक्षणाचा आणि आरोग्य सुविधांचा अभाव व भ्रष्टाचार यांना थारा मिळता कामा नये.

या अतिरिक्त सार्वजनिक संपत्तीचे मूल्य प्रत्येक भारतीयासाठी १० लाख रुपयांहून अधिक आहे. असे असताना, आपण सतत हालअपेष्टा का सहन करायची? आपल्या मुलांनी भुकेले का झोपी जायचे? मूलभूत गरजा भागवण्यासाठीही आपल्या लोकांनी का इतका संघर्ष करत बसायचा?

भारतीयांना समृद्ध बनविण्याची ताकद तुमच्यापाशी आहे. तुमच्या हातात भविष्य आहे. नैतिकदृष्ट्या जे न्याय्य आहे, योग्य आहे आणि जे कितीतरी आधीच व्हायला हवे होते, ते तुम्ही करावे, अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. धन वापसी प्रत्यक्षात आणा आणि प्रत्येक भारतीय कुटुंबाला प्रतिवर्ष एक लाख रुपये सुपूर्द करा. १३० कोटी भारतीयांची स्वप्ने आणि त्यांच्या आकांक्षा तुमच्या हातात आहेत.

आता नाही तर कधी? तुम्ही नाही, तर कोण?

आपले विश्वासू ,
आम्ही, भारतीय नागरिक.

तुमचा पाठिंबा व्यक्त करा

साइन केल्याने तुम्हाला ‘नई दिशा’कडून अधूनमधून अपडेट्स प्राप्त होण्यास तुम्ही संमती दर्शवली आहे. आपण कधीही, सदस्यता रद्द करू शकता.