तुमचे नेतृत्व ही भारताची गरज आहे

“धन वापसी व्यासपीठासोबत, आपण- सारे मतदार, आपल्यातूनच आपले प्रतिनिधित्व कोण करणार, हे निवडू शकू.”- राजेश जैन

इतर पर्यायच उपलब्ध नाही, असे सारे म्हणतात, आपल्या सर्वांच्याच कानावर हे शब्द पडतात.

ते म्हणतात की, जरी त्या पक्षांनी आम्हाला पुरते निराश केले असले तरी इतर पर्यायच उपलब्ध नसल्याने या किंवा त्या पक्षालाच मत देण्यास आम्हाला भाग पडते.

पण हे चुकीचे आहे. अशी स्थिती १० किंवा २० वर्षांपूर्वी होती खरी, पण आता मात्र तसे राहिलेले नाही. राजकीय पक्षांनी निवडलेल्या उमेदवारांना मत देण्यासाठी आता तुम्हाला भाग पाडले जाऊ शकत नाही. मोठे राजकीय पक्ष जे देत आहेत, त्याहूनही श्रेष्ठ पर्याय निवडण्याची शक्ती आपल्यापाशी आहे. ज्यांना आपण उमेदवार म्हणून निवडू, त्यांना निवडणुकीत मत देण्याचे स्वातंत्र्य

आपल्याला आहे. या नव्या स्वातंत्र्यामुळे आपल्याला तंत्रज्ञानाची शक्ती मिळते. यामुळे चांगल्या उमेदवारांना निवडणुकीत उभे राहण्याची मुभा मिळते आणि आपल्याला- मतदारांना आपले खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करतील, अशा उमेदवारांना मत देण्याची संधी मिळते.

जे मला तुम्हाला दाखवायचे आहे, ते आहे तंत्रज्ञान व्यासपीठ- धनवापसी डिजिटल व्यासपीठ. हे व्यासपीठ आपल्या सर्वांना एकत्र यायला मदत करेल आणि लोकसभा जिंकण्यासाठी उमेदवार ‘सिलेक्ट’ करेल आणि ‘इलेक्ट’ही करेल- जेणे करून प्रत्येक भारतीय कुटुंबाला प्रतिवर्ष एक लाख रुपये परत मिळतील.

धन वापसी व्यासपीठाद्वारे, तुम्ही सदस्य म्हणून साइन-अप करू शकता, इतरांना साइन-अप करायला मदत करू शकता, अंतर्गत निवडणुकीद्वारे लोकसभेत तुमचे प्रतिनिधित्व करणारा उमेदवार निवडू शकता आणि तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही स्वत: प्रायमरीज- या उमेदवार निवडीच्या प्राथमिक टप्प्यात लढू शकता. माहितीकरता तुम्ही व्हिडियो पाहा:

मित्रांनो, धन वापसी ही एक मोठी कल्पना आहे, एक धाडसी योजना आहे. आपल्याला मोठ्या योजना बनवाव्या लागतात, कारण लहान योजना आखून जगात काहीही फरक पडत नाही. आपण ताऱ्यांचे लक्ष्य ठेवायला हवे, आपण ते करू शकतो. ते आपले कर्तव्य आहे.

जर आपण एकत्रितरित्या मेहनत केली, तर आपण जिंकू शकतो. आपण जिंकू शकतो, कारण आपली बाजू नैतिकदृष्ट्या योग्य आहे. देशभक्त म्हणून, आपण आपला भारत देश महान करण्यासाठी एकत्रितरित्या काम करायला हवे.

जय हिंद.